मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना बळ देणारी - उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख ( शिंदे गट) सावली
एस.के.24 तास
सावली : राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रचंड लोकप्रिय होत असून ही योजना महिलांना निश्चितपणे बळ देणारी आहे .या योजनेमुळे महिलांचा मोठा सन्मान महायुती सरकारने केला आहे .या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाविकास आघाडीतील अनेकांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे ही योजना फक्त चूनावी जुमला असून नंतर ही योजना बंद केल्या जाईल असा अपप्रचार विरोधक करीत आहेत.
वास्तविक पाहता या योजनेमुळे गरजवंत महिलांना गरजेच्या वेळी राज्य सरकारकडून योग्य मदत दिली गेली यामुळे त्यांचे जीवनात आनंद फुलला आहे .भाजपा महायुती सरकार कायम माता-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राहील असे,उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख सावली यांनी व्यक्त केले आहे.
जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ द्यावा असे सुध्दा उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख सावली यांनी म्हटले आहे आहे.