सोनापुर येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हर घर तिरंगा फेरीतून जागवली देशभक्तीची जाणीव.

सोनापुर येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हर घर तिरंगा फेरीतून जागवली देशभक्तीची जाणीव.


सुदर्शन गोवर्धन - ग्रामीण प्रतिनिधी सावली 


सावली : दि.10/08/2024 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. यातून लोकांना घरी तिरंगा आणून फडकाविण्यासाठी प्रोत्साहीत करते.हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे व भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे, ही या उपक्रमाची मूळ संकल्पना आहे.मागील दोन वर्षांत " हर घर तिरंगा ही मोहीम लोकचळवळ बनली आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जाग्या राहाव्यात, देशभक्तीची भावना कायम रहावी, 

यासाठी शनिवारी (दि. १०) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनापुरच्या वतीने गावातून तिरंगा फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रा.पं.सोनापुरचे उपसरपंच मुकेशभाऊ भुरसे,मुख्याध्यापिका कु.तोडासे मॅडम, पाटील सर आ.सहाय्यक आ केंद्र व्याहाड बूज, ट्राझन शेडमाके सर आ.नि आरोग्य केंद्र व्याहाड बुज, कांबळे सर क्षेत्र कार्यकर्ता,काटकर सर,पराते मॅडम, विगम मॅडम, मडावी मॅडम, बेजगमवार मॅडम,श्री .भोंडे आ.सेवक, कु.स्नेहा गोवर्धन आ.सेविका, कु. साळवे आ. सेविका, सौ .नंदा मेश्राम आशा वर्कर, ज्योती  गोवर्धन आशा वर्कर सहभागी झाले.


जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग प्रारंभी  तिरंगा रॅलीची सुरुवात ग्रामपंचायत पासून करण्यात झाली. गावातील मुख्य मार्गावरुन ही फेरी फुले चौक, गांधी चौक,भीम चौक, ढोल्याचा चौक,हनुमान मंदिर, छ.शिवाजी महाराज चौक,  तसेच सोनापुर हेटीपर्यन्त फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांनी फेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला. हर घर तिरंगा फेरीला  जनतेचा प्रतिसाद मिळाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !