वर्धा येथील बामसेफ च्या राज्य अधिवेशनात,भोजराज कान्हेकर यांच्या " ओबिसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? ★ पुस्तकाचे वामन मेश्राम यांचे हस्ते प्रकाशन.

वर्धा येथील बामसेफ च्या राज्य अधिवेशनात,भोजराज कान्हेकर यांच्या " ओबिसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? 


★ पुस्तकाचे वामन मेश्राम यांचे हस्ते प्रकाशन.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


वर्धा : बामसेफ चे राष्ट्रीय अधिवेशन सरोज मंगलम वर्धा येथे बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.25 ऑगष्ट 2024 ला पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटक,देविदास घोडेस्वार संविधान तज्ञ हे होते. 

सदर कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा बामसेफ चे अध्यक्ष, भोजराज कानेकर सर यांच्या ओबिसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? या पुस्तकाचे प्रकाशन वामन मेश्राम यांचे हस्ते पार पडले प्रकाशन सोहळ्या प्रसंगी,कुंदा तोडकर दिपक वासनिक,राहुल दुर्गे,ॲड राहुल मकरे,ॲड.निता कांबळे,अशोक बोबडे,RPI चे प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत 

तर आंबुलकर सर भन्ते सुमानंद, जर्नाधन ताकसांडे ,प्रमोद राऊत पुंडलिक शेंन्डे गडचिरोली मनोज खोब्रागडे कामराज लोखंडे सुरेश उईके (आष्टी) धनराज गेडाम डॉ.गौतम नगराळे आदि सहीत महाराष्ट्रातून बामसेफ चे बहुसंख कार्यकर्ते उपस्थित होते. 


भोजराज कानेकर यांनी यापूर्वी धार लेखणीची काव्यसंग्रह,राजहंस बोध संग्रह कथासंग्रह आदि पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !