उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न.

उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


सिरोंचा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) कुमार चिंता सा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक रमेश सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूर येथे भव्य जनजागरन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून झिंगानूर गावाच्या प्रथम नागरिक निलिमा ताई मढावि तसेच अध्यक्ष उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी भूषविले.


 तर प्रमुख पाहुणे म्हणून उपपोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे सा. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनबतुलवार साहेब श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कस्तुरवार सा प्रतिष्टीत नागरिकसरपंच निलीमाताई मडावी, माजी सरपंच कारेजी मडावी, माजी उपसरपंच भारत मडावी, समाजसेवक रामचंद्र कुमरी, प्रतिष्ठित नागरिक सिरीया मडावी, दासू मडावी, चंद्रकांत नैताम, पोचम मडावी, रामू मडावी,शासकीय आश्रम शाळा झिंगानूर चे मुख्याध्यापक कुमरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.


बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे साहेब यांनी मार्गदर्शन करताना पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली.


 अध्यक्षीय समारोप करताना उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबद्दल माहिती दिली तसेच आगामी पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिला पुरुष विध्यार्थी यांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध लोकोउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई नत्थू गेडाम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपपोलीस स्टेशन चे प्रभारि अधिकारी अभिजीत तुतूरवाड सा अभिजीत घोरपडे सा. मनबतुलवार सा कस्तुरवार साहेब तसेच सर्व जिल्हा पोलीस अंमलदार आणि राज्य राखीव पोलीस बल नागपूर यांचे सर्व  अधिकारी अंमलदार यांनी सहकार्य केले

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !