विदर्भ माळी समाज विदर्भ प्रदेश अंतर्गत चंद्रपूर जिल्हा माळी समाज मेळावा.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : दिनांक 31 जुलै रोजी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह बालाजी वॉर्ड येथे- विदर्भ माळी समाज संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हा माळी समाजाच्या बैठकीमध्ये समाज कार्याच्या माध्यमातून राजकारण सक्सेस होते.
मा.कांशीरामजी यांनी सिद्ध केलेल्या सूत्राची आपल्या भाषणातून आठवण करून देताना बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी महापरिषद चे अध्यक्ष डॉक्टर,संजय घाटे.या जिल्हा मेळाव्याला सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.संजय घाटे यांनी केवळ माळी समाजाच नाही तर ज्या ठिकाणी ज्या समाजाची संख्या प्रामुख्याने आहे त्या सर्व ओबीसी व बहुजन समाजासाठी उमेदवारी किंवा पक्ष संघटनेमध्ये स्थान देऊन सोशल इंजिनिअरिंग कृतीतून करण्याचे आव्हान सर्व पक्षीय नेत्यांना केले.