सेवानिवृत्त शिक्षक,सुभाष भोंगळे यांचा सपत्नीक सेवा निवृत्ती सत्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निबाळा व शाळा व्यवस्थापन समिती निबाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाष भोंगळे सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सुभाष भोंगळे हे मागील 13 वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निबाळा येथे कार्यरत होते. आज शाळेचा शेवटच्या दिवसी त्यांचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील जेष्ठांपासुन, महिला, विद्यार्थी, तरुण युवकांनी भोंगळे सराच भरभरून प्रेम भावना बोलून दाखवल्या.त्याच कौतुक केले.
या प्रसंगी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच तथा अ.भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की प्राथमिक शाळा हा विद्यार्थांचा पाया आहे. शालेय जीवनात उत्तम गुरुजन आपल्याला लाभले व त्यांचे उत्तम मार्गदर्शन, संस्कार मिळाल्याने विद्यार्थ्याचे जिवन घडण्यास हातभार लाभतो.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक रामा पवार केन्द्र प्रमुख पाढरपौणी बिट, विशेष अतिथी दिपक झाडे ग्रा. प. सदस्य, प्रियंका गेडाम ग्रा. प. सदस्य, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , गोपाल पाल पोलीस पाटील, मनिषा मोडघरे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,
शंकर पाटील मेक्षाम माजी अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती, ज्योती मोडघरे माजी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गोवारदिपे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेबीताई भोंगळे, जेष्ठ नागरिक महादेव पा मेश्राम, प्रशांत पेंदोर अध्यक्ष हनुमान मंदिर कमेटी, भिवसन मोडघरे उपाध्यक्ष हनुमान मंदिर कमेटी, निमकर सर,पेंदोर सर,सिताराम सिडाम, मुरलीधर पेदोर
दिवाकर मोडघरे, मधुकर पेदोर निलकंठ मोडघरे, वासुदेव मेक्षाम, दौलत मोडघरे , राजेश देवाडकर, अमोल उरकुडे, विठ्ठल परचाके, गोविंदा मोडघरे, मोतीराम झाडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोवारदिपे सर मुख्याध्यापक निबाळा यांनी केले तर सुत्रसंचलन नववी चा विद्यार्थी श्रीकांत भोपये यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.