AIMIM पक्षाचं पदग्रहण सोहळा शक्ति प्रदर्शन रॅली आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न.

AIMIM पक्षाचं पदग्रहण सोहळा शक्ति प्रदर्शन रॅली आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न.


गडचिरोली प्रा.मुनिश्वर बोरकर


गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पटेल मंगल कार्यालय येथे AIMIM पक्षा तर्फे इम्तियाज जलील साहेबांचं वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला पक्ष संघटन व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बाशिद शेख यांना AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान करण्यात आले.



AIMIM पक्षाचे विदर्भ अध्यक्ष शाहिद भाई रंगूनवाला,महाराष्ट्र प्रदेश महीला अध्यक्ष किर्ती ताई डोंगरे, विदर्भ सेक्रेटरी कृष्णा भाऊ जाधव,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सय्यद अमान अहमद, सलीम खान,नागपुर शहर अध्यक्ष जावेद शेख, यांनी मार्गदर्शन केले मंचावर जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी,रुपाली ताई आत्राम, आयशा अली, शगुफ्ता शेख, शकीला पठाण, दिलीप बांबोळे, जावेद शेख, शाहरुख शेख, उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश महीला अध्यक्ष किर्तीताई डोंगरे यांनी प्रस्थापित पक्षाच्या राज्यात फक्तं महागाई, बेरोजगारी,शेतकरी आत्महत्या, बलात्कार, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात सपशेल अपयशी ठरले आहेत आणि जनते समोर तीसरा पर्याय म्हणून AIMIM पक्षाला जनते समोर आणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले असदुद्दीन ओवैसी साहेब सभागृहात बेधडक बोलतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे प्रतिपादन किर्ती ताई डोंगरे यांनी केली या वेळीं शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाचे आयोजन बाशिद शेख यांनी केले.


प्रास्ताविक आयशा अली यांनी केलं आभार प्रदर्शन शकीला पठाण यांनी केलं या कार्यक्रमाला  साजिद शेख, जुबेर खान, आदिल खान, किशोर जाधव, तेजराम नेतनकर, विपीन सुर्यवंशी, मुकेश डोंगरे, केदारनाथ गेडाम, गोविंदा शेंडे, महागु शेंडे, मुकेश शेंडे, महबुब मलीक, प्रफुल येरमे, स्वप्नील साळवे,गजानन मेश्राम,मुन्ना रामटेके, दीपक झोडगे, कोमल राजपूत, राजेंद्र सिंह पटवा, मनोहर कुळमेथें,मारोती गावडे, रूपांतर लाडे, शामिना शेख, मनीषा वानखेडे,वर्षा खंडागळे, रुबिना रियाज खा पठाण,शोभा शेरकी, सुनंदा किरंगे, स्मिता संतोषवार,अर्चना संतोषवार, शिल्पा दुर्गे, सुजाता वासनिक, डिंपल खंडागळे, पूनम कौर, सुनीता कुमरे, यास्मिन शेख, फिजा गुड्डू शेख, आदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !