माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखालील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सभेत 56079 अर्जांना मंजुरी प्रदान.

माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखालील  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सभेत 56079 अर्जांना मंजुरी प्रदान.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपूरी : दिनांक,१०/०८/२४ महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी, महिला वर्गावर दुरगामी प्रभाव पाडणारी, महिला वर्गाचा आत्मसन्मान वाढवून सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजनेचा शुभारंभ अतिशय थाटात झालेला आहे. माता भगिनींनी या योजनेला जणु डोक्यावर घेतले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता विधानसभा क्षेत्र निहाय विधानसभा प्रमुख आणि अशासकीय सदस्यांची निवड करून या योजनेला गती देण्याचे कार्य केलेले आहे .


ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली, आणि अशासकीय सदस्य अरविंद राऊत सिंदेवाही तालुका प्रतिनिधी,किशोर वाकुडकर सावली तालुका प्रतिनिधी,यांचे प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.यावेळी ब्रह्मपुरी, सिंदेवाही,सावली तालुक्यांचे मा. तहसीलदार,मा.संर्वग विकास अधिकारी, मा.प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची प्रमुख उपस्थितीत  ब्रह्मपुरीच्या तहसीलदार मा.चौधरी मॅडम यांच्या कार्यालयात संपन्न झाली. 


या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एकूण पात्र 56079 भगिनींचे अर्ज मंजूर करण्यात आले.यावेळी या सभेचे प्रास्ताविक  समिती सचिव मा.सुरेश राठोड प्रभारी प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास अधिकारी ब्रम्हपूरी यांनी केले तर मा.जोन्नमवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास अधिकारी सिंदेवाही यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !