कोरची पासून 2 कि.मी.मोहगाव येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.

कोरची पासून 2 कि.मी.मोहगाव येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.


एस.के.24 तास


कोरची : कोरची तालुका मुख्यालयापासून २ किलोमिटर अंतरावर असलेल्या मोहगाव येथे १८ वर्षीय युवती प्रेमी चंद्रभान मडावी हिने आपल्या राहत्या घरीच दुपारी २ ते ३ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.


युवती ही आपल्या आजी सोबत मोहगाव येथे राहत होती. प्रेमी हिला आई, बाबा,आजी १ बहीण व २ भाऊ असा परिवार असून प्रेमी हिचे आई, वडील व मोठा भाऊ हे छत्तीसगड येथे शेती च्या कामाकरिता वास्तव्यास असून धाकटा भाऊ हा आपल्या उदर निर्वाहकारिता परराज्यात मोलमजुरीचे काम करतो.


दुपारी ४ च्या दरम्यान या युवतीची आजी जेवण्याकरिता आत मध्ये गेली असता तिला बघून धक्काच बसला कारण तिच्या नातीन ने गळफास लावून आपले जीवन संपविले होते.मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे शिक्षण २ वर्षापूर्वी १० वी पर्यंत झाले असून सध्या ती मुलगी मजुरीच्या कामावर जात होती.नेमके या घटण्यामागचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !