दक्षिण धानोरा परिक्षेत्रातील उपक्षेत्र,येरकड मध्ये वन महोत्सव 2024
★ " एक पेड मॉ के नाम अमृत वृक्ष "आपल्यादारी योजने अंतर्गत ५०० रोपांची वृक्षारोपण.
एस.के.24 तास
धानोरा : दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी दक्षिण धानोरा परिक्षेत्र मा.उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग,गडचिरोली मा.मोहमद आझाद (भा.व.से.) मा.एन.जी.केळवतकर द.वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक धानोरा,क्षेत्र सहाय्यक येरकड,क्षेत्र सहाय्यक दूधमाळा,क्षेत्र सहाय्यक तोडे,
वनरक्षक वनमजूर यांचे उपस्थित वन महोत्सव २०२४ येरकड उपक्षेत्रातील मौजा ढवळी ग्रामसभा येथील कक्ष क्र ५५५ मध्ये ग्रामसभा अध्यक्ष, परसुराम कोवाची सचिव,चंद्रशहा तुलावी इतर ग्रामस्थ यांनी " एक पेड मॉ के नाम अमृत वृक्ष " आपल्यादारी योजने अंतर्गत ५०० रोपांची वृक्षारोपण श्रमदान व ग्रामीण लोकांच्या सहभागातून लागवड करण्यात आली.
लागवड केलेल्या रोपांची वन संरक्षण व संवर्धन करण्याचे कार्य वनविभाग व ग्रामसभा करण्याचे ठरविण्यात आले आहेत.सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन श्री.एस.के.डंकरवार क्षेत्र सहाय्यक येरकड यांनी आभार मानले.