वर्धा येथे महिला होमगार्ड ला 2 पोलिसांची बेदम मारहाण करून हात मोडले.

वर्धा येथे महिला होमगार्ड ला 2 पोलिसांची बेदम मारहाण करून हात मोडले.


एस.के.24 तास


वर्धा : महिलांचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेवाभावी महिला होमगार्ड सुद्धा सुरक्षित नसल्याची घटना पुढे आली आहे. या महिलेचा हात तर मोडलाच पण डोकेही ठेचल्या गेले. या प्रकरणी दिनेश तुमाने व जगदीश गराड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.


सदर महिला होमगार्ड रात्रीच्या सुमारास घरी जात असतांना दिनेशने तिला फोन करीत जगदीशच्या घरी बोलावले.१५ मिनिटात घरी न आल्यास तमाशा करेन असे धमकावले. 


तेव्हा कारला चौकात जात ती दिनेशच्या गाडीवर बसून गरडकडे पोहचली. तिथे दिनेशने घरात जाण्यास सांगितले. तेव्हा या महिलेने नकार दिल्यावर गॅलरीत गरडने शिवीगाळ केली. हे पाहून ती पायीच परत निघाल्यावर गरड व तुमाने यांनी पाठलाग करीत तिला अडवून मारहाण सुरू केली. लाथाबुक्क्याने बेदम मारले. नालीत ढकलले. या जीवघेण्या मारहाणीत सदर महिलेचा हात मोडला तसेच डोक्याला मार बसला. सध्या तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिने याप्रकरणी तक्रार दिल्यावर रामनगर पोलिसांनी या दोन पोलीस शिपायावर गुन्हे दाखल केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !