ट्रक च्या चाकात सापडून 1 जण जागीच ठार.
एस.के.24 तास
वडसा : ट्रकने सायकलस्वारास धडक दिल्याने सायकलस्वाराचा ट्रकच्या चाकात सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास देसाईगंज शहरात घडली.
समशेर खॉ सत्तारखॉ पठाण वय,52 वर्ष रा.किदवाई वार्ड असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार मृतक हा शहरातील खानानी हार्डवेअर दुकानातुन काही सामान घेऊन देसाईगंज शहरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून रेल्वे ट्रॅक कडे जाणाऱ्या बायपास मार्गाने सायकलने जात होता.
ट्रॅक क्रमांक MH.34 AB 8867 ची धडक लागल्याने तो चाकाखाली सापडला.
त्यामुळे पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातात ट्रक चालक नानाजी उके (५२) रा. विशी वार्ड याने सायकलस्वाराला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू सायकलस्वार चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झा
घटनेची माहिती ट्रॅक चालकाने स्वतःच ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. देसाईगंज पोलिसांनी ट्रॅक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास वडसा देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलीस करीत आहेत.