ब्रम्हपुरी च्या जलतरणपटूंची विजयी घोडदौड सुरूच ; सलग तिसऱ्या स्पर्धेत 1 सुवर्ण व 5 कांस्य पदकासह एकूण 6 पदकांची कमाई.

ब्रम्हपुरी च्या जलतरणपटूंची विजयी घोडदौड सुरूच ; सलग तिसऱ्या स्पर्धेत 1 सुवर्ण व 5 कांस्य पदकासह एकूण 6 पदकांची कमाई.


★ भविष्यात आणखी पदके मिळविण्यासाठी जिद्दीने प्रयत्नशील.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०८/२४ जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश निश्चित मिळतेच,यांची प्रचिती ब्रम्हपुरीच्या जलतरणपटूनी दाखवून दिली. ब्रम्हपुरी शहराला शिक्षानगरी प्रमाणे क्रीडानगरी म्हणून सुद्धा बहुमान प्राप्त आहे कारण या नगरीतुन अनेक खेळामध्ये पारंगत असे खेळाडू निर्माण झाले आहेत. 


ब्रह्मपुरी मध्ये कमतरता होती ती जलतरण स्पर्धेतील खेळाडूंची ? परंतु ती कमतरता हल्ली क्रमांक, पारितोषक ,पदके प्राप्त तालुक्यातील खेळाडूंनी पूर्ण करून भविष्यात लवकरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणपटू शिवराज मालवी यांच्या नेतृत्वामध्ये परिपूर्ण होईल. ब्रम्हपुरीच्या जलतरणपटूनी क्रमाक्रमाने पदके पारितोषिके मिळवून सिद्ध करायला सुरुवात केली आहे. 

        

ब्रह्मपुरी येथे जलतरण तलाव सुरू होवून केवळ तिन महिने झाले परंतु या तीन महिन्यांच्या कालावधीत शिवराज मालवी यांच्या नेतृत्वाखाली 1 जिल्हास्तरीय व 2 विदर्भ स्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जलतरणपटुनी सिद्ध केले.


 याअगोदर चंद्रपूर , बुटीबोरी येथे उत्कृष्ट यश संपादन केले तसेच रविवार दिनांक ११ऑगस्ट २४ ला दिल्ली पब्लिक स्कूल लावा, धाबा रिंग रोड नागपूर येथील विदर्भ स्तरीय तरंग जलतरण स्पर्धेत विदर्भातून १७५ जलतरणपटूनी सहभाग नोंदविला.


ब्रम्हपुरी येथून शिवराज मालवी यांच्या नेतृत्वामध्ये सहा जलतरणपटू अरिहंत नगराळे, निकोल नगराळे, अलेक्स डांगे, ग्रेस उरकुडे, दीप उरकुडे, व विधी हेमंत उरकुडे सहभागी होवून घवघवीत यश संपादन केले याबद्दल सर्वांचे ब्रह्मपुरीकर जनतेनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


स्पर्धेत अरिहंत नगराळेला २५ मीटर फ्रीस्टाइल मध्ये गोल्ड मेडल,२५ मीटर बॅकस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल, दीप उरकुडेला ५० मीटर बॅकस्ट्रोक व ५० मिटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल तर विधी हेमंत उरकुडे हिला ५० मीटर फ्रीस्टाइल व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल असे  १ गोल्ड व  ५ ब्राँझ मेडलसह एकूण ६ पदकांची कमाई केली. याबद्दल ब्रम्हपुरीच्या जनतेनी सर्वांचे अभिनंदन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !