चांदाळा जवळ कारने केला अपघात 1 ठार 2 जखमी ; मृतक साप चावलेल्या मुलीला दवाखाण्यात नेत होता.





चांदाळा जवळ कारने केला अपघात 1 ठार 2 जखमी ; मृतक साप चावलेल्या मुलीला दवाखाण्यात नेत होता.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : गडचिरोली जवळून 7 कि.मी अंतरावरील चांदाळा वळणावर फोर व्हिलर व टू व्हीलर यांची टक्कर होवून अपघात घडला यात चादांळा (टोली ) येथील 1 व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला.आज दि,10 ऑगस्ट दुपारी 3 च्या सुमारास रानमुल येथील 1 मुलीला साप चावला असता चांदाळा (टोली ) येथील राकेश किरंगे वय,27 वर्ष हा आपल्या नातेवाईक मुलीला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी नेत असताना.


 गडचिरोली वरून गोरे नामक व्यक्ती आपल्या फॅमिली सहीत चांदाळा कडे आपल्या फोर व्हिलर नंबर MH - 31 CR - 3053 गाडीने चादांळा च्या पुढे जाणार होता इतक्यात चादांळा रोड वळणावर टु व्हिलर ला धडक दिल्यामुळे टु व्हिलरचा पुढचा चक्का बाहेर निघाला तर फोर व्हिलर चा पुढचा भाग चेदामेंदा झाला. 


राकेश च्या टु व्हिलर वर रानमुल ची त्याची नातेवाईक व साप चावलेली मुलगी बसली होती.या दोन्ही महिला बचावल्या तर साप चावलेल्या मुलीला दवाखाण्यात वाचविण्याकरीता नेणारा राकेश किरंगेचा मृत्यू झाला. फोर व्हिलर मधील गोरे फॉमीली बाल - बाल बचावले.


 गडचिरोली पोलीसांना माहिती मिळताच ठाणेदार सिजनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असुन सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जखमींना भरती करण्यात आले तर राकेश चा मृत्युदेह उत्तर तपासणी साठी दवाखाण्यात नेण्यात आले.राकेश च्या मृत्युमुळे चांदाळा (टोली ) गावात शोककळा पसरली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !