अण्णा भाऊचे साहित्य प्रकाश आणि ऊर्जा देणारे. - डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०७/२४ " साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंनी नेहमी आपली लेखणी दीन, दलित, कष्टकरी, कामकरी,शेतक-यांसाठी झिजवली.त्यांच्या वाटयाला फक्त दिड दिवसाची शाळा आली तरी त्यांनी आपल्या तरल प्रतिभेच्या जोरावर साहित्यनिर्मिती करुन ते साहित्य सम्राट, लोकशाहीर बनले. फकिरा, सुलतान, चित्रासारख्या चाळीस कादंब-या लिहून सर्वसामान्यांचे विषय हाताळले.'स्मशानातलं सोनं ' ,अनेक पोवाडे,एक नाटक वगैरे विपुल साहित्य आजही वाचले जाते,कारण अण्णा भाऊचे साहित्य प्रकाश आणि ऊर्जा देणारे आहे " असे विचार कवी डॉ धनराज खानोरकरांनी मांडले.
ते अण्णा भाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त ने.हि.महाविद्यालयात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ युवराज मेश्राम होते तर प्रमुख उपस्थितीत डॉ पद्माकर वानखडे होते.अध्यक्षीय मनोगतात, डॉ युवराज मेश्रामांनी, आज रशियामध्ये घरोघरी अण्णा भाऊ वाचले जातात.पृथ्वी शेषाच्या फण्यावर नाही तर दलित,कष्टक-यांच्या तळहातावर तरली गेली आहे,असे ते सांगत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल असा त्यांचा आग्रह होता.याप्रसंगी शेजल म्हशाखेत्रे,निकिता राऊत यांनी विचार मांडले.
कार्यक्रमक मराठी वाड्मय मंडळातर्फे प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ,सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.संचालन दर्शना सुकारे तर आभार धनश्री शेंडे नी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.