खासदार डॉ.नामदेव किरसाण यांची रानडुक्कराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला शेतकऱ्यांचा कुटुंबाची सांत्वनपर भेट. ★ जखमी रुग्णांची ग्रामीण रुग्णालय सावली येथे भेट.

खासदार डॉ.नामदेव किरसाण यांची रानडुक्कराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला शेतकऱ्यांचा कुटुंबाची सांत्वनपर भेट.


जखमी रुग्णांची ग्रामीण रुग्णालय सावली येथे भेट.


एस.के.24 तास


सावली  : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी सावली शहरात एका पिसाळलेल्या रानडुक्कराने हौदोस घालीत हल्ला केला त्यात शेतात काम करीत असताना स्व.आनंदराव चौधरी हे गंभीर जखमी झाले व रुग्णालयात भरती करतावेळी रस्त्यात मृत पावले आज त्यांनी चौधरी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी झाले.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी जि.प.उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, गडचिरोली शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवा शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी मा.प्रशांत राईंचवार,माजी उपगराध्यक्ष मा.भोगेश्वर मोहुर्ले,सह.शेतकरी राईसमील चे अध्यक्ष मा.मोहन गाडेवार, पाणीपुरवठा स्वछता व आरोग्य सभापती मा.प्रितम गेडाम,नगरसेवक मा.सचिन संगीडवार,मा.अंतबोध बोरकर,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सूरमवार,नगरसेविका सौ.साधना वाढई, रजनीकांत मोटघरे, सुनील चडगुलवार, नदीम नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार विपुल येलट्टीवार, मा.राजू बुरीवार,मा.आकाश खोब्रागडे,मा.आशिष मुत्यालवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम तसेच आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर घटनेत1 ठार तर 6 जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.पिसाळलेल्या रानडुक्कराने कवठी वरून सावली ला येणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावली जवळील मोठ्या तलाव रोड वर हल्ला केला त्यात तनु नायबनकर रा. कवठी, केसवी पाल रा कवठी, दुर्गा दहेलकर रा. कवठी या शाळकरी मुली जखमी झाल्या त्या ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती केले असता जखमी रुग्णांची ग्रामीण रुग्णालय सावली येथे भेट घेतली. 


या हल्ल्यात ऐकून 6 जण जखमी झाले असून 3 जणांना गडचिरोली येथे भरती करण्यात आले या संदर्भात वनपरीक्षेत्र अधिकारी मा.विनोद धुर्वे यांच्याशी चर्चा करून खासदार डॉ.नामदेव किरसाण यांनी जंगली प्राण्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा तसेच रुग्णांना लवकरात लवकर आर्थीक मदत मिळवून देण्याकरिता उचित कार्यवाही करण्या संबंधित निर्देश दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !