मुई येथील स्मशानभूमीत आमराई पेरून दिव्यदीपने साजरा केला द्वितीय वर्षपूर्ती सोहळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : १७/०७/२४ 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या काव्यपंक्तीला समर्पक असे कार्य दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी या संस्थेच्या वतीने नुकतेच पार पाडल्या गेले. संस्थेच्या वतीने संस्थेचा व्दितीय वर्षपुर्ती सोहळा स्मशानभूमीतील बाभूळ वनाचे आमराईत रुपांतर करून साजरा केल्या गेला .
दिव्यदीप च्या 'मिशन आमराई' उपक्रमांतर्गत 300 झाडे मुईं ग्रामपंचायत हद्दीतील स्मशाभूमीत लावण्यात आले. तत्पूर्वी संस्थेच्या वतीने जवळपास सात एकर क्षेत्रावर पसरलेले बाभळीचे काटेरी झुडप डोझर,जेसीबी,सात फारी नांगर फिरवून वृक्षारोपण साठी अनुकूल करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कडेने बाभळी काटेरी कुंपण करण्यात आले.
माणसांचे मरण हे वेदनादायी, दुःखदायक असते मात्र मरणोपरांत होणारा अंत्यविधी हा चांगल्या निसर्गमयी ठिकाण असावां अश्या आशयाने सदर उपक्रमाची उभारणी संस्था अधक्ष डॉ स्निग्धा कांबळे यांनी केली.यावर्षी केवळ आंब्याचे झाड लावण्यात आले म्हणून या उपक्रमाला मिशन आमराई असे नाव देण्यात आले.पुढच्या वेळी मिशन आवळाई, मिशन जांभळाई अश्या प्रकारे वृक्षारोपण करणार असल्याचे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून कृ. उ. बाजार समिती ब्रम्हपुरीचे सभापती प्रभाकर सेलोकर, सरपंच उमेश घुले,नगर परिषद ब्रम्हपुरी चे माजी बांधकाम सभापती विलास विखार,प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका अस्मिता कऱ्हाडे मॅडम, उपसरपंच देवराव नन्नावरे, ग्रामसचिव रंजीत नंदेश्वर, पोलीस पाटील रंजना गावतुरे, तमुस अध्यक्ष देवराव मानकर, ग्रामपंचायत सदस्य मुई उपस्थीत होते.
या उपक्रमात गावकरी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी आमराईच्या झाडाचे संगोपन व संवर्धन करण्यात ची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.यावेळी उपस्थित प्रमुख अतिथिनी संस्थेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची स्तुती केली.
वृक्षारोपण कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष राजेश कांबळे, संस्था सचिव सतिश डांगे, कोषाध्यक्ष वैकुंठ टेभूर्णे,सदस्य नरेश रहाटे,संजय बिंजवे,मंगेश नंदेश्वर,लखन साखरे हे पदाधिकारी वृक्षारोपणाला उपस्थित होते.