विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागणी शासनाने पुर्ण कराव्यात ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आदोलन.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : अशंतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिनांक १ जानेवारी २०२४ पासुन बिनाअट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागु करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती गडचिरोली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली समोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले. शासन निर्णय 12, 15 , व24 मधे नमुद केल्याप्रमाणे त्रुटीची पुर्तता केलेल्या प्राथमिक - माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या समान टप्पा वाढ देण्यात यावे.
अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांना अनुदान देण्यात यावे . 30 जुलै २०२४ पर्यंत टप्पा वाढसह अन्य मागण्याचा शासन आदेश निर्गमित करून आचारसाहिता पुर्वी किमान एक महिण्याचा वाढीव टप्पाचा पगार शिक्षकांच्या खात्यांवर जमा करावा.
अश्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत शासनाला देण्यात आले. सदर धरणे आंदोलनात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , डॉ. मिलिंद नरोटे डॉ. तिकडे आदिंनी पाठींबा दर्शवून विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सांगण्याचे आश्वासन दिलेत.
सदर धरणे आंदोलनात अध्यक्ष मुरलीधर कवाडकर ' कार्याध्यक्ष नरेंद्र बोरकर , सचिव मुरलीधर नागोसे सहीत गडचिरोली जिल्यातील विना अनुदानित शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.