भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष,राजरत्न आंबेडकर बौद्ध धम्मा कडून आता राजकारणात ; म्हणतात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझ्या बापाचा पक्ष आहे.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
मुंबई : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष,राजरत्न आंबेडकर ४-५ वर्ष बौद्ध धम्माचे कार्य करून संपूर्ण भारत बौद्धमय करू म्हणणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आता राजकारणा कडे वळले असून आता माझ्या बापाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असुन ती नाही गवईची म्हणत संपूर्ण भारत RPI मय करण्याचे स्वप्न उरासी बाळगुन बौद्ध बांधवासमोर ठेवित आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या मुंबई येथील कार्यक्रमात RPI पक्षाबाबत गर्जना केली . त्यामुळे आता RPI च्या १७ व्या पक्षात १८ व्या राजरत्न आंबेडकरांच्या RPI पक्षाची भर पडणार आहे.30 सष्टेबरला 2024 ला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमधे कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमात देशभरातील विद्वान,साहित्यीक,राजकीय,जाणकार,डॉक्टर,वकील , इंजिनिअर उपस्थित राहणार असुन आंबेडकरी चळवळीतील एका नव्या पर्वाला सुरवात करणार
असुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाची जी १९५४ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्राद्वारे निर्माण केलेली RPI 'पार्टीचा निळा झेंडा घेऊन दोन महिने १० दिवसात संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. संध्या स्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( माजी महामहिम राज्यपाल स्मृतिशेष स.रा. सु गवई ) यांच्या मुलाकडे डॉ. राजेद्र गवई कडे रजिस्ट्रेशन सहीत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान संपवू म्हणणारे बिजेपीवाले व संविधानाचे रक्षण करू म्हणणारे कांग्रेसवाल्यांनी दलितांना भुलथापा देऊन दलितांची मते कांग्रेसने आपल्या पदरात पाडली. यापुढे असे होवू नये म्हणुन होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून दलितांची मते विखुरल्या जावू नये ती संपुर्ण मते RPI च्या उमेदवारांना मिळावी व RPI चा प्रतिनिधी विधानसभेत जावेत यासाठी राजरत्न आंबेडकरांचा संघर्ष प्रवास सुरु झालेला आहे ' एकंदरीत बाबासाहेबांच्या चार नातवाकडे चार वेगवेगळे पक्ष आहेत.
राजरत्न पूढे म्हणाले की लोकसभेत अनु . जातीचे १३१ खासदार तर भारतात एकरा हजार आमदार विविध पक्षाचे आहेत परंतु ते संसदेत व विधानसभेत आवाज उठवित नाहीत त्यामुळे RPI चे आमदार - खासदार संसदेत व विधानसभेत पाठविण्यांचा चंग राजरत्न आंबेडकरांनी बांधला आहे.
मी नविन पक्ष काढणार नाही मी माझ्या बापाचा RPI पक्ष ,माझी वंशावळी , आमचा DNA नुसार RPI पक्षाला नवसंजीवनी देऊन निळा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन राजरत्न आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या शंभराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.यापूर्वी प्रमुख मार्गदर्शक युवराज शंभाजीराजे,राजेंद्रपाल गौतम,शेळके सर,यांचेही भाषणे झालीत.कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.