भावी आमदार सदानंद ताराम गुरुजी यांचा वाढदिवश थाटात संपन्न.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : ऑल इंडिआआदिवासी एम्पाईज फेडरेशन जिल्हा गडचिरोली चे सरचिटणीस तथा केंद्रप्रमुख आदिवासी नेते सदानंद ताराम गुरुजी यांचा वाढदिवश अभिनय ( वासेकर ) लॉन गडचिरोली येथे मोठया थाटात साजरा करण्यात आला.
सदानंद ताराम यांचा जनसंपर्क दांडगा असुन ग्रामसेवक संघटना , शिक्षकांच्या विविध संघटना , आदिवासींच्या विविध संघटना त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या ठाकल्या आहेत. सदानंद ताराम हे आदिवासींच्या हक्कासाठी व विकासासाठी अनेकदा उपोषण , मोर्च , सामाजीक कार्यक्रमात अग्रेसर राहत आलेले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कांग्रेस . राष्ट्रवादी कांग्रेसचे दिग्वज नेते हजर होते तर ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना ' आदिवासी एम्लाईज फेडरेशन , आदिवासी बांधव मोठ्या संख्येनी कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांना शुभीच्छा दिल्यात. त्यांना गडचिरोली विधानसभेत कांग्रेस कडून उमेदवारी निश्चित होवू शकते असे सर्वत्र बोलल्या जात असुन भावी आमदार म्हणुन आतापासूनच चर्चेचा विषय बनला आहे.