व्याहाड (खुर्द) वनपरिक्षेत्र मध्ये वाघाने गुराख्याला केले जखमी ; गुराखी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) वनविभाग सिर्सी येथील झुडपी जंगलात वाघाने गुराख्यावर हल्ला चढविला त्याने आरडाओरड केले असता गावकरी धावून आल्यामुळे गुराखी बचावला.
मुकरु भिकाजी भोयर वय,४५ रा.कढोली येथील रहिवासी गुराखी यांनी दि. ८ जुलै गावातील गुरे ढोरे राखण्याकरीता सिर्सी बिटात झुडपी जंगलात गेला होता दबा धरून बसलेल्या वाघाने मुकरु यांचेवर दुपारी २ चे सुमारास हल्ला चढविला असता त्याने आरडाओरड केली.
त्यामुळे गावकरी धावून गेले व वाघ पळाला.क्षेत्र सहाय्यक सुर्यवंशी व्याहाड (खुर्द) व वनरक्षक,महादेव मुंडे हे घटनास्थळी जावून मुखरु यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.
संध्या प्रकृती चांगली आहे.या बिटात वाघाचे वावर आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जंगलात जावू नये असे वनविभाग सावली यांनी कळविले .