विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सोनापूर येथे आर्थिक मदत.
सुदर्शन गोवर्धन - ग्रामीण प्रतिनिधी,सावली
सावली : दिनांक,21 जुलै 2024 मौजा.सोनापूर येथील तरुण युवक आकाश दशरथ सोनुले यांच्या डोक्यात वारंवार दुखतं असायचे,वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना ब्रेन कॅन्सर असल्याचे सांगितले, घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा.नितीन गोहने यांना मिळाली.
राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सदर मदत मिळवून दिली.आर्थिक मदत देताना तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, कांग्रेस ग्राम कमेटी अध्यक्ष डोमाजी शेंडे, व्याहाड खुर्द चे मा.सरपंच केशव भरडकर, मोखाळा येथील मा.अनिल म्हशाखेत्री,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्रीधर सोनुले,
ग्रामपंचायत सोनापूर माजी उपसरपंच पांडुरंग बांबोळे,सेवा सहकारी संस्था उपाध्यक्ष दिनकर वाघाडे, युवा कार्यकर्ता अविनाश भूरसे,मा.गोपीनाथ सोनुले, तुळशीदास मेश्राम , जयदेव सोनुले, विठ्ठल सोनुले,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.