" एक पेड माँ के नाम " या उपक्रमाचे महत्व समजून घेणे आवश्यक. - डॉ.डी.एच गहाणे
अमरदिप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : आईच्या स्मरणार्थ एक झाड लावणे व झाडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आहे. आज वृक्षाचे किती महत्त्व आहे,हे आपणाला ठाऊक असेल ही,परंतु एक वृक्ष हा आपल्याला शुध्द हवा व पाऊस देतो पर्यावरणाचे संतुलन योग्य ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय फळवृक्ष हा फळ देतो हे फक्त वृक्षच सर्व काही देत असतो.
मात्र अलिकडे वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे असंतुलन बिघडून तापमानात वाढ दिसत आहे. त्याचबरोबर पाऊसाचे अनियमित पणा दिसून येत आहे. कुठे महापूर तर कुठे सुका दुष्काळ पहायला मिळते हे सर्व परिणाम प्रचंड प्रमाणात वृक्षतोडीमुळे झाले आहे.
त्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्यानी एक झाड दत्तक घेतले पाहिजे व त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे असे मौलिक विचार प्राचार्य डॉ डी. एच.गहाणे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धन श्रीमती नेवजाबाई बाग या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,डॉ रेखा मेश्राम राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ प्रकाश वट्टी, डॉ विवेक नागभिडकर व डॉ दर्शना उराडे उपस्थित होतें. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अभय पांडे, वेदांत मेहता,साहिल शहारे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.