व्याहाड खुर्द येथे कांग्रेस च्या खासदाराचा सत्कार.
★ खा.धानोरकर गैरहजर कांग्रेसमधे वाद उफाळल तर नाही ना ? तर रिपाईत नाराजी.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सावली : विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार यांच्या उपस्थितीत व आयोजीत करण्यात आलेला कांग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा दि.७ जुलै रोजी ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील व्याहाड (खुर्द) येथे आयोजीत करण्यात आला होतो.सदर सत्कार सोहळ्यात चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचीत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती लाभली होती.
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या नवनिर्वाचीत खासदार,प्रतिभा धानोरकर यांना निमंत्रण देवून सुद्धा व कार्यक्रमाच्या वेळात चंद्रपूर येथे कांग्रेस कार्यालयात हजर असताना सुद्धा त्या सत्काराला उपस्थित झाल्या नाहीत त्यामुळे कांग्रेसमधे अंतर्गत वाद उफाळल तर नाही ना ? असा सवाल कांग्रेस कार्यकर्त्या मधे केल्या जात आहे.
चंद्रपुर लोकसभेच्या तिकीटाच्या उमेदवारीवरून मोठा संघर्ष झाला होता.तसेच सत्कार सोहळ्याचे आयोजक वेगळेच होते या कारणाने खासदार प्रतिभा धानोरकर यांची नाराजी होतीच त्यामुळे त्या सत्कार सोहळ्यास अनुपस्थित होत्या असे कुनबी समाजाच्या नेत्याचे म्हणणे होते.
याऊलट १५ दिवसापूर्वी कुनबी समाजाचा मेळावा व्याहाड येथे पार पडला तेव्हा कुनबी समाजाच्या मेळाव्यात याच गावात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हजेरी लावून सत्कार स्विकारला होता. त्यांच्या सत्काराला कुनबी समाजातील कांग्रेस , भाजपा,सेनाचे दिगग्ज नेते उपस्थित होते.
मात्र कालच्या मेळाव्यात त्यांनी मंचावर येणे टाळले.कांग्रेसमधे अर्तंगत कलह तर आर.पी.आय. मधे नाराजी आहे.महाराष्ट्रीत लोकसभा निवडणुकीत वंचितला न जुमानता तमाम बौद्ध बांधवांनी कांग्रेसच्या उमेदवारांना भरभरून साथ दिल्यामुळे कांग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. आता मात्र कांग्रेसच्या सत्कार सोहळ्यात रिपाईच्या जिल्हा नेत्यांना कोणत्याच प्रकारचे स्थान देण्यात आले नाही.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व विरोधी पक्ष नेते,विजयभाऊ वडेट्टिवार आयोजीत खासदारांचा सत्कार या दोन्ही वेळेस आर.पी.आय जिल्हा नेत्यांना डावलल्या गेले.अशीच भुमीका कांग्रेसची असेल " गरज सरो,वैध मरो " काम झाले माझे अशीच भुमीका कांग्रेस नेत्याची राहील तर याचे परिणाम कांग्रेसला पुढे भोगावे लागतील असेही एका रिपाई नेत्यांनी कांग्रेसवाल्यांना सभेत ठणकावून सांगितले आता कुनबी समाज एकवटत आहे.
बौद्ध बांधवही एकत्र यायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया रिपाई प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले.सदर सत्कार सोहळ्यात खासदार डॉ. किरसान व विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार सोहळ्यास कांग्रेसचे व कुनबी समाज संघटनेचे बहुसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.