ब्रम्हपुरी तालुक्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या.

ब्रम्हपुरी तालुक्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : 22 जुलै 2024 रविवार सायंकाळी सात वाजेपासून रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे अ-हेर नवरगाव येथील काही घरांचे नुकसान झाले आहे.यात नरेश रामकृष्ण बारापात्रे हे झोपले असता अचानक घराची भिंत कोसळली सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र घरातील अन्नधान्य  रात्रभर आलेल्या पावसामुळे ओले झाले. 



त्यामुळे त्यांचा वास सुटू लागला.दुसऱ्या घटनेत उत्तम दोनाडकर यांच्या सुद्धा घराची भिंत कोसळली.रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अ-हेर नवरगाव व परिसरातील आवत्या व रोवणी धान शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नांदगाव,भालेश्वर, पिंपळगाव,अ-हेरनवरगाव  या परिसराला सागराचे रूप प्राप्त झाले आहे .


शेतात साचलेल्या पाण्यामुळे धान  सडण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.शासनाने अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे शक्य तितक्या लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त बाधितांना मदत मिळेल या अपेक्षेने गावातील, परिसरातील नागरिक  शासनाच्या घोषणांकडे डोळे लावून बसलेले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !