मुल तालुक्यातील हळदी गावात बाप व मुलाने शेजारच्या व्यक्तीचा शिर धडा वेगळे केले. मुल तालुक्यातील हळदी गावात बाप व मुलाने शेजारच्या व्यक्तीचा शिर धडा वेगळे केले.

मुल तालुक्यातील हळदी गावात बाप व मुलाने शेजारच्या व्यक्तीचा शिर धडा वेगळे केले.                                                              

राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : मुल तालुक्यातील मुल पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी या गावात अंगणातून विद्युत पुरवठ्याचा सर्विस वायर गेल्याने एकमेकात वाद झाला आणि वाद इतका विकोपाला गेला की, वादातून मुख्य आरोपी गुरुदास पिपरे व मुलगा सुरज पिपरे हे दोघे बाप लेक  मिळून शेजारच्या राजेश शेषराव बोदलकर वय वर्ष वय,34 वर्ष याला कुऱ्हाडी ने बोदलकर च्या गळ्यावर वार करुन वाद झालेल्या जागेवरच घटनास्थळी राजेश बोदलकर याची हत्या केली.           


घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या माहितीनुसार खाजगी जागेतून विद्युत कनेक्शन लावायचे असल्याने मृतकाच्या जागेमधून सर्व्हिस वायर जात असल्याने त्यांच्यात जागेवरून वाद झाला. व वादाचे रूपांतर अखेर कुऱ्हाडीने वार करून हस्त्या करण्यापर्यंत गेल्याची घटना शनिवार दिनांक ६/७/२०२४ रोजी सकाळी १० वाजता घडली. 


घडलेल्या  घटनेची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना देताच  मूल पोलीस  हळदी गावात घटनास्थळी त्वरित पोचल्याने मोठा अनर्थ टळला, नाहीतर दोन्ही आरोपींना गावकरी जिवंत राहू दिले नसते, अशी चर्चा गावकर्यात केली जात आहे. 


मृतकाचे शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असून बाप व लेक दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी भागत  व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी,यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक  मेश्राम करीत आहेत.या घटनेने हळदी गावात व तालुक्यात असेही घडू शकते अशी चर्चा केली जात आहे. 


मृतक राजेश बोदलकर हा शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मृतकास पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार असल्याचे समजले. तपासाअंती नेमके प्रकरण उजेडात येण्याची शक्यता आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !