प्रेरणादायी मार्गदर्शनाचे उपक्रम कौतुकास्पद. - संगीता ठलाल

प्रेरणादायी मार्गदर्शनाचे उपक्रम कौतुकास्पद. - संगीता ठलाल

 

मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


कुरखेडा : महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा रामगड येथे मा.अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या प्रेरणेतून दर शनिवारी  शाळेतील विद्यार्थांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनाकरिता  उपक्रमाचे आयोजन  केले जातात.


या प्रेरणादायी मार्गदर्शन  उपक्रमासाठी मुख्य वक्ते व मार्गदर्शक म्हणून कुरखेडा येतील सुप्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या वतीने, मुख्याध्यापक मा.  तुमसरे यांनी  संगीता ठलाल यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. या प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी मुख्य मार्गदर्शक,वक्ते म्हणून बोलताना  संगीता ठलाल यांनी विद्यार्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.


अनेक विषयावर मार्गदर्शन केले. त्या बोलताना म्हणाल्या  की  अशा  उपक्रमात जेव्हा वक्ते मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनातून  विद्यार्थांना प्रोत्साहन मिळतो, त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आज  असे उपक्रम प्रत्येक शाळेत घेणे काळाची गरज आहे म्हणून त्यांनी व्यक्त होताना शाळेला तसेच शिक्षक वृंदांना  शुभेच्छा  दिल्या.   शाळेचे   सोबतच शाळेला भेट वस्तू  म्हणून   काही पुस्तके, दिवाळी अंक भेट  दिले.  


व एवढा सन्मान शाळेच्या वतीने मिळाला म्हणून  शासकीय आश्रम शाळेचे आभार मानले.त्या कार्यक्रमास्थळी अध्यक्ष म्हणून   मंचावर उपस्थित असलेले मुख्याध्यापक तुमसरे सर, कुंडगिर सर, पत्रे सर, टेकाम सर,वानी सर, व संगीता ठलाल या प्रामुख्याने  उपस्थित होत्या सोबतच उपक्रम पार पाडण्यासाठी शिक्षिका वाळके मँडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व बहुसंख्येने विध्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !