संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करा.भारतीय कॉम्युनिष्ठ पक्षाची मागणी.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी भारतीय कॉम्युनिष्ट पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. आमच्या मालकीच्या बँक , रेल्वे , LIC , कारखाने , शाळा - महाविद्यालये , विमानस्थळ , जहाजबंदरे , आदि अदानी - अंबानी यांना कवळीमोल किमतीत विकून संविधान विरोधी RSS,भाजप सरकार मुलांच्या कायम नोकरीचा हक्क हिरावून घेत आहे. तर केंद्रात असलेल्या भाजप सरकारने सात्यत्याने जातनिहाय जनगणने चा विरोध करीत आहे.
सन १९३१ मधे जनगणना झाली होती त्यानंतर २०११ मध्ये जनगणना झाली परंतु त्याची अमलबजावनी झालीच नाही. आता भाजप सरकार जातनिहाय जनगणनावर गप्पचआहे . तेव्हा महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात ठराव पास करून तो केंद्रसरकारकडे शिफारस करावी अशी मागणी भाकपा ने केलेली आहे.
आरक्षणाची मर्यादा ५०% ' जास्त नसावी , खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करावे अश्या मागणीचे निवेदन भाकपा तर्फे शासनाकडे केलेली आहे. निवेदन देताना भाकपाचे सरचिटणीस डॉ.महेश कोपूलवार , देवराव चवडे , संजय वाकडे ' रुषी दाऊवार , सुरेश फुकटे , मनोज दामले ' मिनाक्षी सेलुकर, शिंदु कापकर , चेतन ठवरे , प्रकाश ठलाल , जनीखा पठाण सहीत बहुसंख्य भाकप कार्यकर्ते उपस्थित होते.