ब्रह्मपुरी-वडसा रोड वरील भूती नाल्यावर ठिय्या आंदोलन.



ब्रह्मपुरी-वडसा रोड वरील भूती नाल्यावर ठिय्या आंदोलन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,१४/०४/२४ भूती नाल्यावरील नवीन उंच पुलांच्या बांधकामात दिरंगाईमुळे पर्यायी रस्त्याच्या मागणी संदर्भात भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते विनोद झोडगे रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते प्रशांत डांगे यांच्या नेतृतवात नागरिकांनी शनिवार 13 जुलै2024 रोजी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत ये जा करणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही.असा पवित्र घेतला मात्र  नायब तहसीलदार गोविंदवार यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकाची भेट घेतल्यानंतर  आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.

     

ब्रह्मपुरी वडसा ५४३ राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी शहराजवळच्या भूती नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरूआहे.त्यामुळे बाजुला तात्पुरत्या स्वरूपात रहदारीसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला होता . मात्र, पहिल्याच पावसात नाल्याच्या पाण्याने रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. दरम्यान, या मार्गाने प्रवास करणारे रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांना ब्रह्मपुरी शहराशी जोडणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.


स्थानिक प्रशासनाकडून पर्यायी मार्ग म्हणून ब्रह्मपुरी कुर्झा वडसा असा मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र अरेर नवरगाव येथील एक व्यक्तीचा ट्रॅव्हल्सने अपघात झाला त्यानंतर ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी यांनी जड वाहतुकीसाठी तो मार्ग बंद करून ३५३ डी ब्रह्मपुरी आरमोरी हा मार्ग सुरू केला आहे.

      

ब्रह्मपुरी वडसा राष्ट्रीय महामार्गावरीलभूती नाल्यावर असलेला जुना पूल हा कमी उंचीचा असल्यामुळे दरवर्षी पावसामध्ये महामार्ग बंद होत होता. यावर उपाययोजना म्हणून या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यातआला. कंत्राटदाराने जानेवारी मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करतांना सर्वप्रथम जुना पुल जमीनदोस्त केला. या मार्गावरून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून लगतच तात्पुरत्या रहदारीसाठी कच्चा वळण रस्ता तयार केला. मात्र पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेल्याने ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद झाला. मात्र सदर जो रस्ता बनविण्यात आलाआहे तो तात्पुरत्या व कच्चा स्वरूपाचा आहे.


 त्यामुळे ब्रह्मपुरी किंवा वडसा येथे येजा करणाऱ्या नागरिकांना लांबचा टप्पा गाठून प्रवास करावा लागत आहे. शिवाय ठेकेदाराने या नवीन पूल बांधकामात मोठ्या प्रमाणात विलंब केल्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रचंड शालेय नुकसान होत आहे. नागरिकांना पक्का त्वरित पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्याव्या अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यावेळी सदर संबंधित ठेकेदार.प्रशासन व नेत्यांवर ताशेरे ओढण्यात आले. 


यापूर्वी लाखांदूर तालुक्यातील एका प्रेग्नेंट असलेल्या महिलेला या मार्गाने ब्रह्मपुरी येथे हॉस्पिटलमध्ये आणीत असतांना रस्ता बंद असल्यामुळे दवाखान्यात पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला होता. 


त्यामुळे आंदोलकांनी   घोषणाबाजी करीत ठेकेदारावर मनुष्य वधाचा  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत निषेध केला.आंदोलनात विविध पक्षाचे नेते,सामाजिक कार्यकर्ते , व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !