पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना चिचपल्ली व पिंपळखुट नुकसानग्रस्त कुटुंबातील व्यक्ती ना भेट घेऊन केले ब्लैकेटचे वाटप. ★ कांग्रेसचे ज्येष्ट नेते,संतोष सिंह रावत यानीं दिला मदतीचा हात.

पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना चिचपल्ली व पिंपळखुट नुकसानग्रस्त कुटुंबातील व्यक्ती ना भेट घेऊन केले ब्लैकेटचे वाटप.


★ कांग्रेसचे ज्येष्ट नेते,संतोष सिंह रावत यानीं दिला मदतीचा हात.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : चिचपल्ली व पिंपळखुट गावातील नुक‌सानग्रस्त कुटुंबातील व्यक्ती ना भेट घेऊन केले ब्लैकेटचे वाटप चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सतत पाण्याची धार सुरू आहे.जिल्हात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चाचपल्ली येथील तलावाचि पार फुटल्याने संपूर्ण गावात पावसाचे पाणी शिरले होते.यामुळें चाचपल्ली गावातील असंख्य कुटुंबातील लोकंचे मोठे नुकसान झाले.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सि.डि.सि.सि.बैकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चाचपल्ली पिपंळखुट येथिल नुकसानग्रस्त कुटुंबातील लोकांना ब्लॅकेटचे वाटप केले तसेच चिचपल्ली येथिल नागरिकांना जेवणाची सोय करून दिली ज्या कुटुंबातील मोठी आर्थिक हानी झाली अशा कुटुंबांना संतोष सिंह रावत यांनी आर्थिक मदतही केली.प्रशासकीय स्तरावरून पुन्हा मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्न करणार असेही आश्वासन दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !