भालेश्वर,अ-हेरनवरगाव येथील जनता पट्टेदार वाघाच्या दहशतीखाली.

भालेश्वर,अ-हेरनवरगाव येथील जनता पट्टेदार वाघाच्या दहशतीखाली.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,०९ /०७/ २०२४ भालेश्वर,               अ-हेरनवरगाव, पिंपळगाव (भोसले)ही गावे जंगलाने व्यापले नसून सुद्धा या परिसरातील जनतेला कधी बिबट तर पट्टेदार वाघाचे दर्शन घडत आहे.


गेले काही दिवसापासून पहिल्यांदाच वैनगंगा नदीकिनारी शेत शिवारात पट्टेदार वाघ, वाघीण  आपल्या पिलासह भालेश्वर ते अ-हेरनवरगाव, पिंपळगाव (भोसले )या परिसरातील शेत शिवारात भ्रमण करताना  शेतकऱ्यांना दिसत आहे.सध्या रोवण्याचा हंगाम सुरू असताना रात्रौ बे रात्री दररोज शेता वरती शेतीला मोटार पंपाचे पाणी देण्यासाठी ये - जा करावी लागते.अशा स्थितीत शेतावरती ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन घडत आहे.

त्यामुळे या परिसरातील जनतेत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पट्टेदार वाघाचे होत असलेले दर्शन याची माहिती भालेश्वर येथील पोलीस पाटील व गावकरी यांनी वनविभागाला दिली. असता वनविभागाचे अधिकारी श्री सेमकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.


रोज दिवसा व रात्र येऊन जनतेला संरक्षण देण्याचे काम करीत असुन  जनतेला वारंवार सूचना देतात की वाघ ज्या ठिकाणी बस्थान मांडून बसलेले आहेत त्या परिसरात गर्दी करून गोंगाट न करण्याचा सल्ला देत आहेत. वाघाला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत असून  परिसर शांत ठेवीत असुन ते वाघांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.


परिसरात कधीही न घडणारे पट्टेदार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे सध्या परिसरात कुतूहलाचा विषय झालेला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर दररोज दिसणाऱ्या वाघांचा त्वरित बंदोबस्त करून  भालेश्वर ,अ-हेर नवरगाव, पिंपळगाव (भोसले) या परिसरातील जनतेला भयमुक्त करून शेतीचे हंगाम सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करावे अशी शेतकरी,जनतेने वनविभाग अधिकारी ब्रह्मपुरी यांना मागणी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !