ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ चव्हाण परीवार तर्फे नवेगाव व मिंथुर येथील वर्ग,१० आणि वर्ग १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ चव्हाण परीवार तर्फे नवेगाव व मिंथुर येथील वर्ग,१० आणि वर्ग १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 


एस.के.24 तास


नागभीड : ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ चव्हाण परीवार तर्फे नवेगाव पांडव आणि मिंथुर येथील वर्ग ल,१० आणि वर्ग १२ मधील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दिनांक १३/०७/२०२४ ला मिथुर येथील समाज मंदिरात घेण्यात आला.या सत्कार समारंभात वर्ग १० चे  २५ आणि वर्ग १२ चे २६ असे एकून ५१ गुणवंत विद्यार्थी होते. 



त्यांना रोख रक्कम,स्मृती चिन्ह व रजिस्टर, पेन व सन्मान प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिवाकरजी नवघडे सेवानिवृत्त शिक्षक नवेगांव पांडव हे होते. 

मार्गदर्शक,अँड.शर्मिलाताई रामटेके सरपंच नवेगांव आयु.विशाखाताई डोंगरे सरपंच मिथुर,आयु,खोकले ताई उपसरपंच मिंथूर, अरुणजी चव्हाण सेवानिवृत्त शिक्षक बालापूर, आयु,शारदाताई नवघडे कार्यकर्ता नवेगांव हे होते. 


त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात मा.डॉ.दिशांत मेश्राम साहेब गडचिरोली, आयुः शांताबाई गेडाम नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. तर मिंथुर व नवेगांव चे बरेच पालक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु,रतिरामजी चव्हाण सर चंद्रपूर यांनी केले. 


कार्यक्रमाचे संचलन आयु.प्रज्ञा चव्हाण चंद्रपूर यांनी केले. तर सर्वांचे आभार हिमांशु गेडाम ब्रम्हपुरी यांनी मानले. शेवटी सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची समाप्ती केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !