कवी / लेखक श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
- : रुपये दीड हजार : -
एस.के.24 तास
महिन्याचे दीड हजार
योजना केली सुरू
कागदपत्रासाठी सतत माहेरा
जावे लागते फिरू फिरू...१
दिवसाकाठी रुपये फुकट
फक्त पन्नास भेटतील
जाणे येणे झेरॉक्स साठी
रुपये हजारो आटतील...२
निंदन रोवण्या धोवण्याची
रोजी दीडशे दोनशे
नाही परवडत दादा आम्हाला
फुकटाचे मानधन पंधराशे...३
पोरा बाराच्या शिक्षणाचे.
फुकट दरवाजे खुले कर
दवाई,पाणी,महागाई,गॅस
भाऊ! घराचा विज बिल भर...४
मोह म्हणून बेहडा
देऊ नको आमच्या हाती
शाल पांघरून नको मारु जोडे
आम्हा गरिबांच्या छाती...५
समजून उमजून अडाणी
कसा होतोस रे बंधू
सत्तेसाठी आमचे हातपाय
नको लालीपाप ने बांधू...६
सळसळते कष्टाचे रक्त
गोठवू नको आळसाने
आनंदी संसाराचा गाडा
मोडू नको कलहाने...७
जसे आहोत तसे आम्हा
सुखात घरी राहू दे
डोळा भरून चांगले कार्य
भगिनी तुझे पाहू दे...८
स्वार्था पेक्षा परमार्थ तुझा
करत राहील सदा भला
वाटू नको काहीच मोफत
तुझाच राहील बोलबाला...९
खाल्या घराचे कधीच कोणाचे
मोजु नको वासे
क्षणिक आनंदासाठीआपल्या
नको करु जीवनाचे हासे...१०
अदली साठी बुदली
नको दवडु रे सख्या
मणिपूर करु नकोस
सांगतील राज्याच्या राख्या...११
सांगतील आमच्या तुला राख्या
आमच्या तुला राख्या...
श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे कवी / लेखक /सहसंपादक - एस.के.24 तास मु.पो.अ-हेरनवरगाव ता.ब्रम्हपुरी जिल्हा.चंद्रपुर मो.नं. - ८३०८००५८६८