काँग्रेस तर्फे पेंढरी मक्ता येथे दोघांना आर्थिक मदत.
★ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनचा पुढाकार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,२८ जुलै २०२४ तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे विविध आजारांनी ग्रस्त दोन रुग्णांना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे पेंढरी येथील काँग्रेस कार्यकर्त्या श्रीमती अंजुताई सौ.प्रसन्नाताई अल्लुरवार यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.पेंढरी मक्ता येथील आदित्य सुधाकर आत्राम वय ३४ वर्षे हे भूमिहीन शेतमजूर व कुटुंब प्रमुख आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, मागील काही महिन्यापासून काम करीत असताना पाय कमजोर पडून ते खाली कोसळत होते, तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना बोन टी.बी. असल्याचे सांगितले,काही दिवसातच त्यांना बाज पकडावी लागली,घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली.
तसेच पेंढरी मक्ता येथील रमेश दंडमवार वय ५७ वर्षे हे गंगरिंग या आजाराने ग्रस्त होते त्यांना सुद्धा पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,चकपिरंजीचे उपसरपंच मा.अरविंद भैसारे,मा.निलेश अल्लुरवार,मा.राकेश गड्डमवार,मा.विजय गावंडे तसेच आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.