विद्यार्थ्यांना यशाची शिखर गाठायचे असल्यास संघर्ष करावे लागेल. - डॉ.मिलिंद नरोटे
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली च्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सोहळा व अभाविप नूतन कार्यकारणी घोषणा करण्यात आली.यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंदजी नरोटे उपस्थित होते, अभाविप गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, निर्वाचित अधिकारी रोशनजी ठाकरे,नगर मंत्री अभिलाष कुनघाटकर,आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.प्रास्ताविक भाषण प्राध्यापक धर्मेंद्र मुनघाटे यांनी केले, नगर मंत्री 2023-24 मध्ये झालेल्या कामाची माहिती देऊन कार्यकारणी विसर्जित केले, 2024-25 अभाविप नूतन कार्यकारणी नगरमंत्री ची घोषणा व नगरमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन मान्यवराच्या हाताने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पालकवर्ग,अभाविप पूर्व कार्यकर्ता,उपस्थित होते.