नवरगाव च्या पुलावरून वाट काढत असतांना तिघेजन पुलावर लटकले. ★ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचली नाही.पुर वाढतच होता अखेर चुरचुरा वासीयांनी हिमत्तीने त्यांना बाहेर काढले.

नवरगाव च्या पुलावरून वाट काढत असतांना तिघेजन पुलावर लटकले. 


आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचली नाही.पुर वाढतच होता अखेर चुरचुरा वासीयांनी हिमत्तीने त्यांना बाहेर काढले.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत.अश्यातच पोर्ला  - चुरचुरा नवरगाव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला आहे. 


अश्यातच नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला मुलगा व भाचा बाईक वरून नवरगाव पुला वरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव पुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुडपाचा आधार घेवुन लटकले तर एक जण पुलावरच मध्यतरी थांबुन कडल्यांला धरून होते.


चुरचुरा त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी गेलेत परंतु हतबल होवून वापीस आलेत आता आप्पती व्यवस्थापन  NDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 


दि.२५ ला नागपूरचे पाहुणे दुपार पासुनच पुलावर लटकलेले होते सांयकाळी ७ वाजले परंतु अजुनही काहीच हालचाली दिसत नाही मात्र चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. 


त्यांना सुखरूप बाहेर काढून आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाही चुरचुरा येथील कोतवाल लोणारे ताई यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !