नराधम बापाने स्वतःच्या मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती केले.
एस.के.24 तास
नागभीड : पत्नीच्या गैर हजेरीचा फायदा घेत स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागभीड तालुक्यातील एका गावात घडली. विशेष म्हणजे, आश्रम शाळेला सुटी लागल्याने मुलगी आपल्या गावी आली होती.
पती,पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब तालुक्यातील एका गावात राहत होते.एप्रिल महिन्यात आरोपीची पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेली होती.याच वेळी तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेली 13 वर्षीय ही अभागी मुलगी शाळेला सुट्या लागल्याने गावी आली.
पत्नी घरी नसल्याने मुलीला पाहून आरोपीच्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने पोटच्या मुलीशीच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. मुलीने विरोध केला.पण धमकावून तो तिला चूप ठेवत होता.
भलेही आरोपी मुलीस चूप राहण्यास भाग पाडत होता. मात्र शरीरधर्म त्याचे कर्तव्य बजावत होता. अशातच शाळा सुरू झाली आणि मुलगी परत शाळेत गेली. शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आणि शाळा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.
शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 376 व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.