नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून तातकाळ आर्थिक मदत दया ; खासदार डॉ. किरसान यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र.
एस.के.24 तास
गडचिरोली : सतत च्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द प्रकल्पातून सूरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा, आमागाव, ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भागाता पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले, गावात आणि शहरात पाणी शिरल्याने घरांची आणि अन्यधाण्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अश्या सर्व नुकसान ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून गरजूना आर्थिक व आवश्यक ती मदत करण्यात यावी अश्या सूचना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.