स्पंदन फाउंडेशन गडचिरोली तर्फे कारगिल विजय दिन साजरा ; माजी सैनिकांचा केला सत्कार.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने स्पंदन फाउंडेशन गडचिरोली यांच्यातर्फे डॉ.मिलिंद रामजी नरोटे यांच्या सौजण्याने स्पंदन हॉस्पिटल गडचिरोली येथे सेवानिवृत्ती सैनिक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी माजी सैनिक कमलाकर वडेट्टीवार, केशव वट्टे, राजू भांडेकर, धनराज गिरडकर, मनोज राजूरकर, सत्येंद्र राम सिंग गोस्वामी, सोमनाथ वैरागडे, महादेव वासेकर या माजी सैनिकांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. सुरेश लडके, सतीश चिचघरे व डॉ प्रशांत चलाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्पंदन फाउंडेशन नेहमीच सामजिक उपक्रमात सहभागी असेल असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रामुख्याने डॉ. सुरेश लडके,सतीश चिचघरे , डॉ. प्रशांत चलाख,डॉ. धम्मदीप बोदेले, डॉ. डॉ.पंकज सकिनलवार,डॉ सौरभ नागुलवार,डॉ. किशोर वैद्य, महेश काबरा,डॉ.हेमके, डॉ.उमेश समर्थ, डॉ.उनाकट ,अनुज बोदेले, धनंजय सहदेवकर, हरीश माकडे, पंकज सोमनकर, तुषार चुधरी व स्पंदन हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होत