अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०७/२४ अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रम्हपुरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष रूषीजी राऊत होते तर उद्घाटक म्हणून श्री.निवास चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्रजी शिंदे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. देवीदासजी जगनाडे दामोधरजी मिसार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर
किष्णाभाऊ सहारे माजी उपाध्यक्ष चंद्रपूर जि. परिषद, प्रा.प्रकाशजी बगमारे, हरीश्चंद्रजी चोले संयोजक जेष्ठ नागरिक संघटना, अॅड. गोविंद भेंडारकर सचिव अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी, विनोदजी झोडगे , डॉ. सतीशजी दोनाडकर,हिरालालजी पेंटर नाट्यकलावंत,सौ. वनिताताई ठाकूर माजी नगराध्यक्षा, प्रा. राकेशजी तलमले अध्यक्ष रयत बहुद्देशिय संस्था, राजेशजी पिलारे, फाल्गुनजी राऊत, महादेवजी दर्वे, नेकराजजी वझाडे, राजेशजी दोनाडकर, योगेशजी मिसार प्रा. तेजस गायधने उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आपल्या उद्घाटनिय भाषणात रविंद्रजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांचे पहिले गुरू आई -वडिल असतात त्यानंतर शिक्षक हे दुसरे गुरु असतात. आई-वडिलांच्या त्यागामुळे व तुमच्या मेहणतीने तुम्हाला हे यश प्राप्त झाले. त्यामुळे आपल्या पालकांचा त्याग लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या यशस्वी वाटचालीला सुरवात करावी. या सोबतच त्यांनी आपल्या चेरिटेबल ट्रस्टच्या कामगीरी बद्दल माहिती दिली.
सदर सत्कार सोहळ्यात इयत्ता दहावी, बारावी, आयआयटीला प्रवेश घेणारे विद्यार्थी, सी.ए. परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्द्घाटक मान.रविंद्रजी शिंदे, हिरालालजी सहारे पेंटर, योगेशभाऊ मिसार यांचे शाल, श्रीफळ व सम्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील जेष्ठ मंडळी, महीला, युवक व विद्यार्थी तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊराव राऊत यांनी केले तर सुत्रसंचालन रामकृष्णजी चौधरी, ओमप्रकाशजी बगमारे व अल्काताई खोकले यांनी केले तर आभार मोंटूभाऊ पिलारे यांनी सर्व उपस्थितांचे मानले .