चातगांव वनपरिक्षेत्रातील रोपवन लागवडीतील कामकाजाची व आर्थीक व्यवहाराची चौकशी करून आर.एफ.ओ.ला निलंबित करा. - विजय खरवडे यांची मागणी.

चातगांव वनपरिक्षेत्रातील रोपवन लागवडीतील कामकाजाची व आर्थीक व्यवहाराची चौकशी करून आर.एफ.ओ.ला निलंबित करा. - विजय खरवडे यांची मागणी. 


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक 


गडचिरोली : चातगांव वनपरिक्षेत्रातील झालेल्या रोपवन लागवडीतील कामाची आर्थिक चौकशी करावी.लाच पाठविणाऱ्या वनपाल व RFO यांचेवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनसंवाद (भष्ट्राचार निमुर्लन समिती ) चे राज्याध्यक्ष अशोक सब्बन व जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवारव वने प्रधान सचिव यांच्याकडे केलेली आहे. 


चातगाव वनपरिक्षेत्रात रोपवन लागवडीच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे रोपवन लागवड ' खोदतळे , साहित्य खरेदी , टिसीएमची कामे , कामावरील मजुर , मजुरांचे वावचर , बॅक खाते , ची माहिती घेतली असता प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे नि दर्शनात आले. सदर कामाची उच्च चौकशी  केली असता धास्तावलेले RFO व वनपाल यांनी मी पैशाची मागणी न करता माझ्या मोबाईलवर १० हजार रुपये phone pay मारले तेव्हा त्यांना कशाला असे केले विचारणा केली.


असता उध्दड उत्तर मिळाले म्हणजेच सदर कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच ते माझ्यासी असे वागले तेव्हा रोपवन लागवडीच्या कामाची व पैशाची योग्य चौकशी करून चातगांव वन विभागातील वनपाल व वनपरिक्षेत्रधिकारी यांचेवर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ निलबिंत करावे अन्यता शासनाला वेढीस धरले जाईल अशा ईशाराही विजय खरवडे यांनी दिला .


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !