चिचपल्ली येथे भीषण अपघात अपघात सुदैवाने जीवित हानी नाही.
★ अपघातग्रस्ताना भूमिपुत्र ब्रिगेड ची मदत.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : आज दुपारच्या सुमारास चिचपल्ली येथे हायवेवर दोन समोरसमोरून येणाऱ्या बसेसचा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेस समोरासमोरून धडकल्या होत्या. सुदैवाने दोन्ही बसेसच्या वाहन चालकांना गंभीर दुखापत झाली नाही पण बसेस मधील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.
प्रवाशांना व वाचालकाला लगेचच गावातील लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात हलविले. त्या दरम्यान भूमिपुत्र ब्रिगेडची टीम पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चीचपल्ली येथेच उपलब्ध होती. घटना घडताच भूमिपुत्र ब्रिगेड ची टीम नी मदत कार्य सुरू केले,समोरची परिस्थिती बघता बहुजन मेडीकोज असोसिएशन (BMAC)चे डॉ.राकेश वनकर आणि आरोग्य केंद्राच्या डॉ. बढे आणि डॉ भोयर यांनी प्राथमिक उपकेंद्रत दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांवर उपचार केले.
आणि त्यांना दिलासा दिला. त्याचवेळेस डॉ. राकेश गावातुरे वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुल येथे असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच थेट चीचपल्ली उपकेंद्रत पोहोचले आणि रुग्णांना सेवा दिल्ली व रुग्णवाहिकेद्वारे चंद्रपूर येणे येथे नेण्यास मदत केली.