रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२०/०७/२४ काल सकाळपासून पाण्याची रिपरिप सुरू असता रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगत असलेल्या शेती व तलावाचे पाणी गावातील रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे अनेक घरांमध्ये,सेतू केंद्र,मेडिकल मध्ये पाणी घुसल्यामुळे घर मालकांची मोठी तारांबळ उडाली. गावातिल ग्रामपंचायत च्या पटांगणात वाहणारे पाणी साचल्यामुळे पटांगणाला तलावाचे रूप प्राप्त झाले.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हरिदास लहुजी मेश्राम, प्रमोद दादाजी देवढगले, भाऊराव रामचंद्र ढोरे यांच्या घरांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.तसेच शेतामध्ये अतोनात पाणी जमा झाल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती तयार झाली आणि शेकडो हेक्टर जमिनीवर लावलेली धानपिके ही पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी व पडलेली घरे यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी असे नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालक यांचे म्हणणे आहे.