" शासकीय काम बारा महिने थांब " शिधापत्रिकेत नाव चढवने व कमी करने प्रक्रिये साठी लाडक्या बहिणींची... ➡️ तहसील कार्यालयात पुरवठा विभागात तूफान गर्दी.


शासकीय काम बारा महिने थांब "  
शिधापत्रिकेत नाव चढवने व कमी करने प्रक्रिये साठी लाडक्या  बहिणींची...


 ➡️ तहसील कार्यालयात पुरवठा विभागात तूफान गर्दी.

 

मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


कुरखेडा : तहसील कार्यालय  कुरखेडा येथील  पुरवठा विभागा मध्ये नाव कमी करने ,संलग्नीत करणे तसेच नाव ऑन लाइन करण्याच्या प्रक्रिये करीता भल्ली मोठी गर्दी दररोज होतांना दिसते आहे, संथ गतिने होत असलेले काम,आणि कागदाचा बंच हातात घेऊन नंबर लागेल.


या प्रतिक्षेत् नागरिक चांगलेच वैतागले आहेत. सदर बाब अशी की शिधा  पत्रिकेत नाव कमी व समाविष्ट करण्यासाठी तालुका परिसरातील शेकडो नागरिक पुरवठा विभागाकडे धाव घेत आहेत,  त्यात नव्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्या कड़े शिधा पत्रिकेत नाव असून ऑन लाइन नाही असे अर्जदार तहसील पुरवठा कार्यालय मध्ये येऊन वेळेत आपले काम करण्यास पाहात आहेत.


कुरखेडा तहसील शी सरळ जोड़नारा गोठनगाव नाका  सती नदी वरील तात्पुरता तयार करण्यात आलेला रपटा पहिल्याच पाण्याने वाहुन गेल्याने,परिसरातील  नागरिकांना १० ते १५ किमी चा जास्त प्रवास करून तहसील कार्यालय गाठावे लागत असुन कार्यलायात येऊन फक्त अर्ज देण्यासाठी पूर्ण दिवस जात आहे या बाबी मुळे  नागरिक संतप्त झाले आहेत, एक तर  अधिकचा  प्रवास मग अर्ज देउनही दोन दोन महीने लोटूनही काम होत नाही.


" शासकीय काम बारा महिने थांब " या म्हणीची प्रचिती ईथे दिसुन येत आहे. वरिष्ठ अधिकार्यानी या विभागा मार्फत गावो गावी शिधा वितरक धारकांना कड़े ही अर्ज जमा करून गैर सोय होत असलेल्या नागरिकांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !