कुसुमताई अलाम यांचा कांग्रेसकडे अर्ज सादर.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेस पक्षाकडे कुसुमताई अलाम यांनी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे कांग्रेस कार्यालय गडचिरोली यांचेकडे आपला अर्ज सादर केला.कुसुमताई अलाम ह्या साहित्यीक असुन त्या माजी जिल्हा परिषद सदस्य (मौशीखाब मुरमाडी क्षेत्र ) होत्या त्यांनी गडचिरोली विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक लढविली होती.
त्या आदिवासी नेत्या असुन कांग्रेसचे नेते राहुल गाँधी , माजी खासदार दत्ता मेघे ' वाळवी आणि इतर कांग्रेसचे महत्वाचे नेते याच्यासोबत चांगले सबंध आहेत. त्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी नेत्या म्हणुन प्रसिद्ध असुन त्या आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त आहेत.त्यांनी २०२३ ला आदिवासी साहित्य सम्मेलनाच्या आयोजक होत्या.
त्या दि.माजी मंत्री बाबुराव मडावी च्या खदे समर्थक आहेत.त्यांनी अनेक कार्यक्रम,मोर्चा,उपोषण करून आदिवासींना न्याय मिळवून दिलेला आहे. कांग्रेस पार्टीने कुसुमताई आलाम यांच्या नावाचा योग्य विचार करून उमेदवारी घ्यावी अशी त्यांची ईच्छा आहे.उमेदवारी अर्ज भरतांना आदिवासी एकता युवा परिषद,आदिवासी विकास परिषद,आदिवासी बांधव उमेशभाऊ उईके,मुकुंद मेश्राम,प्रदिप कुळसंगे,कुणाल कोवे,सुनिता उसेंडी, संजयभाऊ मेश्राम,सुरज मडावी व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.