बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा कार्यकारिणी गठित.

बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा कार्यकारिणी गठित.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.


डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे 


सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे  कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु   पोटावी , डॉक्टर कन्नाके,इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके  यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !