बि.एसी ऍग्री.साठी वाढिव तुकडी द्यावी. - डॉ. मिलिंद नरोटे
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : गडचिरोली - चंद्रपूर रोडवर असलेली सुशोभीत इमारत कृषी महाविद्यालत अनेक समस्या आहेत. त्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात व BSC ( Agri ) ची जादा तुकडी वाढवावी अशी मागणी डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे केलेली आहे.
कृषी महाविद्यालय समोर सभोवताली कुंपण नाही त्यामुळे जनावरांचा त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी तर चक्क वाघाने प्रवेश केला होता. प्रात्याक्षिक जागा वाकडी येथे आहे. त्याठिकाणी सुद्धा तारेचे कुंपण नाही किंवा संरक्षण भिंत नाही. तिथे तर वाघाचा वावर आहे.
गडचिरोली येथे स्वतत्र कृषी विद्यापीठ स्थापन करावे , B Tech व BSC foresty अभ्यासक्रम सुरु करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणविस यांचेकडे डॉ.मिलिंद नरोटे,डॉ.धम्मदिप बोदेले,सि.ए.अदित्या, डॉ.जेजु,ऍड उमेश मडावी,अतुल तिर्रे,पंकज सोमनकर,सतिश चिचघरे , डॉ.पनतिया,सेलुवार'सुरेश लडके आदिनी केलेली आहे.