गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ.



गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ.


एस.के.24 तास


गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाडा कुणाचा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडा बसस्थानक पासून अवघ्या काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत आहे.मागील बऱ्याच वर्षापासून कुणीही या इमारतीत वास्तव्य करीत नसल्याने दुरावस्था झालेली आहे.आजू बाजूला हिरवे गवत यासह छोटे मोठे झाडे झुडपे वाढलेली आहेत. अश्यातच गोंडपिंपरी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे.दि. २१ जुलै रविवारला सकाळ पासूनच पावसाला सुरवात झाली.



दुपार च्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतल्याने गावातील एक इसम बकऱ्या चारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गेले.बकऱ्या चारत असतानाच अचानक जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने सदर इसम चक्रावला.लागलीच सदरची माहिती गावकऱ्यांना दिली.घटनेची महिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली.








सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा असल्याची माहिती गोंडपीपरी पोलीसाना देण्यात आली. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. पाहणी केली असता जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा दिसला. यात सदर अज्ञाताची डोक्याची कवटी शरीरापासून वेगळी झालेली दिसली. शरीराचा काही भागाचा सापळाही दिसून आला.




मानवी सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला.वैद्यकीय अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलविन्यात आले. रात्री सात वाजे पर्यंत चौकशी सुरू होती. तपासणीअंती मानवी सांगाडाचे काही नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.



एखादा वेडसर इसम तिथे वास्तव्यास राहिला अन् तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर इसमाचा सांगाडा एका पिशवीत भरून विठ्ठलवाडा येथील स्मशानभूमीत पुरविण्यात आला आहे.यावेळी गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य शुभम पिंपळकर, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, टीकाराम डाहुलेसह गावातील नागरिक हजर होते.





अगदी गावाला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जीर्ण इमारत आहे. हाकेच्या अंतरावरच खाद्य पदार्थाची दुकाने यासह इतर दुकाने आहेत. उन्हाळ्याचे दिवसात याच इमारतीच्या परिसरात तरुण मंडळी क्रिकेट खेळत असतात. लघुशंका आली की अनेकजण याच इमारत परीसराचा आधार घेतात. असे असतानाही मृतदेहाची दुर्गंधी का आली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा सापडल्याने नागरिकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !