नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी. - महेश गिरडकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी. - महेश गिरडकर


एस.के.24 तास


नागभीड : चंद्रपूर जिल्हासह नागभिड तालुक्यात गेले चार दिवसांपासून आलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांची शेतजमीन पुराच्या पाण्यामुळे खुप नुकसान झाले असून पिकांसह शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


चार दिवसांपासून पीक पाण्याखाली असल्याने पीक सडण्याची भिंती असून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश गिरडकर यांनी रविंद्र शिंदे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख यांच्या मार्फतीने पाठविलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

      

तालुक्यातील मुख्य पीक हे भातशेती असून या भरोशावरच शेतकरी वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र दरवर्षी ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होत आहे गेल्या चार दिवसांपासून तालुक्यांत संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचे धानपीक पाण्याखाली सापडले आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश गिरडकर यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !