प्रा.मुनिश्वर बोरकर वंचित बहुजन आघाडी च्या वाटेवर.

प्रा.मुनिश्वर बोरकर वंचित बहुजन आघाडी च्या वाटेवर. 


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर हे रिपब्लिकन पार्ट्यांना कंटाळून व भाजपा - कांग्रेस एकाच माळेचे मनी असुन संविधान बाबत धर सोडपणा सुरु असुन झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी बौद्ध जनतेला मुर्ख बनविण्याचे काम केले.अश्या परिस्थितीत प्रकाश आंबेडकर याचा वंचित बहुजन आघाडी हा मागे पुढे समाजाचे भले करणारा पक्ष ठरू शकतो.


या धर्तीवर प्रकाश आंबेडकरांना मानून प्रा.मुनिश्वर बोरकर वंचित कडे जाणार असल्याचे बोलल्या जात असुन नुकतेच पार पडलेल्या वंचित च्या बैठकीसाठी वंचित चे पुर्व विदर्भ संयोजक,मुरली मेश्राम व माजी मंत्री,रमेश गजभे यांची भेट प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी घेतल्यामुळे चर्चला उथान आले असुन जर का तसे झाले तर वंचित चे जिल्हाध्यक्ष,बाळू टेंभुर्णे व प्रा.मुनिश्वर बोरकर हि गोड जोडी केवळ गडचिरोलीतच नव्हे तर संपूर्ण चिमुर लोकसभा क्षेत्रात कमाल करू शकतात व यातुनच कांग्रेसला फार जड जावू शकतो.


वंचितचे पुर्व विदर्भ संयोजक मुरली मेश्राम यांना बोरकरा च्या भेटीबद्दल काय घडले असे एस.के.24 तास न्युज चॅनल चे मुख्य संपादक, सुरेश कन्नमवार यांनी विचारले असता.भेट झाली व सकारात्मक चर्चा झाली ते वंचित कडे आलेत तर त्यांना वंचितमधे मोठी कामगिरी दिली जाईल असे बोलले. तर याबाबत प्रा.मुनिश्वर बोरकर यांना फोन वरून विचारले असता आंबेडकरी नेत्यांची भेट घेणे वाईट नाही सदर भेट हि औपचारिक होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !